• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) पेक्षा अधिक दर आकारून ग्राहकांची होत असलेली आर्थिक फसवणूक तातडीने थांबवावी तसेच एमआरपी संदर्भात देशात सक्षम आणि प्रभावी कायदा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण जनजागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. निवेदनामध्ये ग्राहकांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

संघटनेने केंद्र शासनाकडे एमआरपीसंदर्भात सुधारित व कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच एमआरपीची पडताळणी आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली. बाजारपेठेत वाढीव एमआरपी, खोटी सूट आणि दिशाभूल करणाऱ्या किंमत धोरणांवर कठोर निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांना वस्तूंच्या किमतीबाबत संपूर्ण पारदर्शकता मिळावी यासाठी प्रत्येक उत्पादनावर एमआरपीसोबत मूळ उत्पादन खर्चही छापणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर विशेष नियंत्रण यंत्रणा लागू करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी म्हणाले, “सध्या अनेक ठिकाणी ग्राहकांकडून छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारले जात आहेत. किमतींमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि जनजागृती हेच या आंदोलनामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.”

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी व्यापारी व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलनात प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, सचिव दिनेश थोरात, प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल कुऱ्हाडे, महिला अध्यक्षा अमिता कोहली, पद्मा दायमा, उपाध्यक्ष अशोक शेवाळे, सुरेश रहाणे, सहसचिव जितेंद्र पितळे, सीताराम बोरुडे, हरिभाऊ चौधरी, अप्पासाहेब औटी, पारनेर तालुकाध्यक्ष शहाजी पांढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

Next Post

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In