• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर ५ परिसरातील मच्छी मार्केटजवळ अवघ्या चार महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या फुटपाथवरील पेव्हर ब्लॉकची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे समोर आले आहे. नव्याने करण्यात आलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

स्थानिकांच्या माहितीनुसार, फुटपाथवरील अनेक पेव्हर ब्लॉक खचले असून काही ठिकाणी ते उखडून गेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा फुटपाथ धोकादायक बनला आहे.

फुटपाथवरील ब्लॉक विस्कळीत झाल्यामुळे गटाराच्या झाकणांजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. अवघ्या चार महिन्यांतच विकासकामाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार, सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहणे अपेक्षित असते. मात्र संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांचा पैसा वाया जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची तांत्रिक तपासणी करून कामातील त्रुटींची चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच फुटपाथची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पनवेल महानगरपालिका संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

Next Post

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
146
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
6
Next Post
चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In