• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जय विनायक बिल्डक्रॉप व जेएसव्ही डेव्हलपर्स प्रकरणातील ६३० गुंतवणूकदारांना दिलासा; २२ कोटींच्या मालमत्ता जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

जय विनायक बिल्डक्रॉप लिमिटेड आणि जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या ६३० गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने संबंधित कंपन्यांच्या तब्बल २२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची अडकलेली रक्कम परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर २०११ ते ३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत जय विनायक बिल्डक्रॉप लिमिटेड आणि जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी ११.५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), आष्टी, आर्वी तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील नागरिकांकडून आरडी, फिक्स डिपॉझिट आणि विविध गुंतवणूक योजनांद्वारे मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या.

गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सुमारे २ कोटी ५ लाख २८ हजार ३४० रुपये रक्कम परत केली नाही. त्यानंतर कंपनीची कार्यालये बंद करून ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी विजयालक्ष्मी जगमोहन कठेत, अमीत कोनदेव चौधरी, प्रमोद कुकडे, देवेंद्र नागपूरे, दिनेश हेमराज टेंभरे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५७/२०१९ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब), एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व ४ तसेच अनियमित ठेव योजना प्रतिबंध अधिनियमातील कलम २१, २२, २३ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूकग्रस्त ६३० गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी आरोपी कंपन्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव एमपीआयडी कायद्यानुसार शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २५ मे २०२६ रोजी राजपत्र अधिसूचना जारी करून संबंधित कंपन्यांच्या सुमारे २२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

तसेच या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून आर्वी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची अडकलेली रक्कम परत मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, ठेवी परत मिळविण्याबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Previous Post

सयोग बिल्डर्स प्रकरणातील ४१७ गुंतवणूकदारांना दिलासा; ५२.७३ लाखांची मालमत्ता जप्त

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; वर्ध्यात २० गुन्हे दाखल, १० आरोपी अटकेत

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
27
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
11
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
1
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
5
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
3
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; वर्ध्यात २० गुन्हे दाखल, १० आरोपी अटकेत

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; वर्ध्यात २० गुन्हे दाखल, १० आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In