• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सयोग बिल्डर्स प्रकरणातील ४१७ गुंतवणूकदारांना दिलासा; ५२.७३ लाखांची मालमत्ता जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

सयोग बिल्डर्स अँड रिअल इस्टेट प्रा. लि. कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या ४१७ गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने कंपनीच्या ५२ लाख ७३ हजार २२२ रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

RelatedPosts

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ मार्च २०११ ते ३ जानेवारी २०१७ या कालावधीत नांदेड येथील सयोग बिल्डर्स अँड रिअल इस्टेट प्रा. लि. या कंपनीने आरडी, फिक्स डिपॉझिट तसेच विविध गुंतवणूक योजनांमध्ये १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या.

मुदत पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने गुंतवणूकदारांची तब्बल ५६ लाख ५५ हजार ५४४ रुपये रक्कम परत केली नाही. त्यानंतर कंपनीचे कार्यालय बंद करून गुंतवणूकदारांची फसवणूक व अपहार केल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेंद्रप्रसाद शंकर विश्वकर्मा, हेमलता सुरेंद्रप्रसाद विश्वकर्मा, सुनील निवृत्ती जाधव आणि सोपान नामदेव खंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १८/२०१७ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ५०४, ५०६, १२० (ब) तसेच एमपीआयडी कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या ४१७ गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी आरोपी कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव एमपीआयडी कायद्यानुसार शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १२ मे २०२६ रोजी राजपत्र अधिसूचना जारी करून कंपनीच्या ५२.७३ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

तसेच या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून वर्धा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची अडकलेली रक्कम परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईचे फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांकडून स्वागत करण्यात येत असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वर्धा पोलिसांची धडक कारवाई; जिल्हाभर विशेष मोहीम

Next Post

जय विनायक बिल्डक्रॉप व जेएसव्ही डेव्हलपर्स प्रकरणातील ६३० गुंतवणूकदारांना दिलासा; २२ कोटींच्या मालमत्ता जप्त

Related Posts

Blog

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

July 19, 2026
8
Blog

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

July 19, 2026
5
Blog

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
10
आजऱ्याच्या सोहम चव्हाणचे NEET व JEE Main परीक्षेत दैदिप्यमान यश
Blog

आजऱ्याच्या सोहम चव्हाणचे NEET व JEE Main परीक्षेत दैदिप्यमान यश

July 19, 2026
25
डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांना यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत पीएच.डी. पदवी
Blog

डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांना यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत पीएच.डी. पदवी

July 19, 2026
9
Blog

रायगाव येथे निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; मा. अमृता ताई वाघे यांची प्रमुख उपस्थिती

July 19, 2026
19
Next Post

जय विनायक बिल्डक्रॉप व जेएसव्ही डेव्हलपर्स प्रकरणातील ६३० गुंतवणूकदारांना दिलासा; २२ कोटींच्या मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

July 19, 2026

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

July 19, 2026

व्यंकटराव हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In