• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

चाळीस हजारांहून अधिक शिक्षणसेवकांची शासनाकडे ई-मेलद्वारे व्यथा

सोलापूर | प्रतिनिधी

राज्यातील शिक्षणसेवकांना त्यांच्या तीन वर्षांच्या सेवाकालात वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा, अपघाती विमा संरक्षण तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचा लाभ मिळावा, अशी मागणी राज्यातील चाळीस हजारांहून अधिक शिक्षणसेवकांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून शिक्षणसेवकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

RelatedPosts

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

राज्य शासनाच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी साधारणतः दोन वर्षांचा असतो. या कालावधीत त्यांना नियमित वेतन, वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा आणि इतर शासकीय लाभ मिळतात. मात्र शिक्षणसेवकांना तीन वर्षे केवळ मानधनावर सेवा बजावावी लागते. या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय संरक्षण, आरोग्य विमा किंवा सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षणसेवक केवळ अध्यापनाचे काम करत नसून शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या, मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार, निवडणूक कामे, बीएलओची जबाबदारी, जनगणना, सर्वेक्षणे तसेच शासनाकडून सोपविण्यात येणारी विविध अशैक्षणिक कामेही पार पाडत आहेत. नियमित शिक्षकांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनही त्यांना समान सुविधा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सन २०२४ मधील शिक्षक भरतीनंतर राज्यातील अनेक शिक्षणसेवकांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित कुटुंबियांना सानुग्रह अनुदान, विमा संरक्षण किंवा आर्थिक मदत मिळत नसल्याने कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिक्षणसेवकांनी शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

  • शिक्षणसेवक कालावधीत आरोग्य सेवा, वैद्यकीय परतावा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
  • सेवेत असताना मृत्यू किंवा अपघात झाल्यास कुटुंबियांना सानुग्रह अनुदान व आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी.
  • शिक्षणसेवकांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची सुविधा लागू करावी.
  • भविष्यात शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल (शिक्षक) कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले की, “राज्यातील शिक्षणसेवक शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसह शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करून शासनाने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, अनुकंपा तत्त्वाचा लाभ आणि मानधनवाढ या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात.”

राज्यातील हजारो शिक्षणसेवक आता शासनाच्या सकारात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व विधवा महिलांच्या पेन्शनला विलंब; राज्यभरातील लाभार्थी प्रतीक्षेत

Next Post

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

Related Posts

Blog

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
5
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
112
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.
Blog

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026
18
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
Blog

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

September 11, 2026
4
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

September 11, 2026
116
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
Blog

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

September 11, 2026
3
Next Post
मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

ताज्या बातम्या

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In