• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काँग्रेसचे किनवटमध्ये पेरणी आंदोलन; बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
काँग्रेसचे किनवटमध्ये पेरणी आंदोलन; बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

नांदेड | प्रतिनिधी (मोईन)

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या प्रश्नांवर जोरदार मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयासमोर अनोखे “पेरणी आंदोलन” करण्यात आले. नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी कर्जमाफी, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार तसेच आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करत, युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती योजना राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याने महागाई नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

याशिवाय आदिवासी, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष धोरण आखावे तसेच शासकीय योजनांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.

मोर्चानंतर काँग्रेस नेत्यांनी शासनाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात प्रदेश सचिव धनराज राठोड, डॉ. पुंडलिक आमले, के. मूर्ती, गिरीश नेमानीवर, ईश्वर चव्हाण, नंदिनी टारफे, सुभाष राठोड, ईसरत चिखलीकर, वसंत राठोड, अनिल बंगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

महावितरणचा भोंगळ कारभार; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In