• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

बालकांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीवा रुजविण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आयोजित करण्यात आलेले सात दिवसीय बाल संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. नगरसेविका स्वप्नालीताई योगेश जामदार मित्र मंडळाच्या वतीने १ जून ते ७ जून या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी श्लोक, प्रार्थना, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार तसेच ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर शिरूर संवादिनी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. योगगुरू विनायक पोटे व लोखंडे सर यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. कराटे प्रशिक्षण सुदाम राखुडे, चित्रकला व हस्ताक्षर प्रशिक्षण संदीप वेताळ, अबॅकस प्रशिक्षण प्रतिभा पुजारी यांनी दिले. तसेच ओंकार संगीत विद्यालय, शिरूर यांच्या वतीने तबला व पेटीचे प्रशिक्षण देण्यात आले.

शिबिरादरम्यान डॉ. मोनिका धापटे-धुमाळ यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी तर डॉ. साळुंके यांनी नेत्र तपासणी केली. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारे विविध उपक्रम या शिबिरात राबविण्यात आले. शिबिर पूर्ण केलेल्या १०८ विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमात दररोज विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मच्छिंद्रशेठ जामदार यांच्या वतीने राबविण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन जामदार, भरत कालेवार, विजय शिर्के, सागर शिर्के, संजय कडेकर आणि राजेंद्र गोरडे यांचे विशेष सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे, सभापती डॉ. सुनिताताई पोटे, उपसभापती स्वप्नालीताई जामदार, रवींद्र धनक, नगरसेवक अमोल चव्हाण, नगरसेवक गणेश कोळपकर, मच्छिंद्र जामदार, पाटील मॅडम, डॉ. वैशाली साखरे, लोखंडे मॅडम, शशिकला काळे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांनी अशा बाल संस्कार शिबिरांची समाजाला मोठी गरज असल्याचे सांगितले. त्यांनी प्रभागातील हा उपक्रम समाजहिताचा असल्याचे नमूद केले. रवींद्र धनक यांनी पालकांनी स्वतः आदर्श आचरण ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. सुनिताताई पोटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भावी पिढी घडविण्यासाठी तो महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

नगरसेवक अमोल चव्हाण यांनी अशा शिबिरांचे आयोजन सर्व प्रभागांमध्ये व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. गणेश कोळपकर यांनीही शिबिराचे कौतुक केले. यापुढे प्रत्येक रविवारी बाल संस्कार वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती योगेश जामदार यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली साखरे यांनी केले. प्रास्ताविक योगेश जामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेविका स्वप्नालीताई योगेश जामदार यांनी केले.

Previous Post

काँग्रेसचे किनवटमध्ये पेरणी आंदोलन; बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर

Next Post

मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव

मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In