• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

पंचायत समिती शिरोळ अंतर्गत शिरढोण (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाला पंचायत समिती शिरोळचे सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, ग्रामपंचायत शिरढोणचे प्रशासक सागर भंडारे, ग्रामपंचायत सदस्य ललिता जाधव व शक्ती पाटील, माजी उपसरपंच अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व अजय भोसले, ग्रामसेवक विराज जथे, तालुका अभियान व्यवस्थापक संपदा भोपळे, तालुका व्यवस्थापक स्मिता सम्यक, प्रभाग समन्वयक सोनाली हराळे तसेच कृषी व्यवस्थापक अनुराधा पाटील-उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वयं-सहाय्यता बचत गटांची भूमिका, उद्योजकता विकास आणि स्वावलंबन याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांना बचत, कर्ज सुविधा, उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात उमेद अभियानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करत रासायनिक खतांचा मर्यादित वापर, सेंद्रिय खतांची निर्मिती, जैविक कीडनियंत्रण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाश्वत शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

शक्तीपीठ महामार्गाविरोधात विट्यात राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा; मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर तीव्र संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
37
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post
शक्तीपीठ महामार्गाविरोधात विट्यात राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा; मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर तीव्र संताप

शक्तीपीठ महामार्गाविरोधात विट्यात राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा; मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर तीव्र संताप

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In