• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चूलवड-काकरपाटी रस्त्याची ऐशी की तैशी! खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
चूलवड-काकरपाटी रस्त्याची ऐशी की तैशी! खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी; बिरसा फायटर्सचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

धडगाव | प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील चूलवड ते काकरपाटी या अंदाजे सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

यासंदर्भात संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, तसेच जगदीश डुडवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चूलवड ते काकरपाटी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम अवघ्या एका वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता अल्पावधीतच उखडून गेला असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र खड्ड्यांमुळे वाहन चालविणे धोकादायक बनले असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेषतः गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे इतके खोल झाले आहेत की, “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बिरसा फायटर्स संघटनेने संबंधित रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे आणि रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे.

Previous Post

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Next Post

घाटली ग्रामपंचायतीत निधीवरून वाद पेटला; जुन्या-नव्या कारभाराच्या चौकशीची मागणी, राजकीय वातावरण तापले

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
159
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
38
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
घाटली ग्रामपंचायतीत निधीवरून वाद पेटला; जुन्या-नव्या कारभाराच्या चौकशीची मागणी, राजकीय वातावरण तापले

घाटली ग्रामपंचायतीत निधीवरून वाद पेटला; जुन्या-नव्या कारभाराच्या चौकशीची मागणी, राजकीय वातावरण तापले

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In