• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहरातील प्रतिष्ठित महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या गांधी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन यशवंत शांताराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांच्या सक्रिय सहभागातून विषयपत्रिकेवरील सर्व नऊ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

सभेदरम्यान संस्थेच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. सभासदांनी आपली मते आणि सूचना मांडत संस्थेच्या भावी वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा केली. ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर सोनार, भीमराज धाकड, संजय तावडे, दिनेश पाटील, यशवंत ठाकरे, विठ्ठल बच्छाव आणि राणी जांभळे यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवून विविध सूचना मांडल्या.

सभेतील आयत्या वेळच्या विषयांमध्ये संस्थेच्या ताब्यात असलेल्या उर्वरित शिल्लक भूखंडाबाबतचा मुद्दा विशेष चर्चेचा विषय ठरला. या भूखंडाच्या भवितव्याबाबत संस्था पुढे कोणती भूमिका घेणार, याबाबत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर संस्थेचे सचिव जयेंद्र चव्हाण, व्हाईस चेअरमन मोहन आप्पा पाटील आणि संचालक यशवंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. संबंधित भूखंडासंदर्भातील तांत्रिक बाबी, अडचणी आणि संस्थेची भावी दिशा याविषयी त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.

या विशेष सर्वसाधारण सभेला संस्थेचे ज्येष्ठ संचालक मानक पाटील, मोहनभाऊ राजपूत, मुकुंद भावसार, संचालिका करुणाताई पाटील आणि आशाबाई सिंधी यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.

सभेचे वातावरण अत्यंत सलोख्याचे आणि सकारात्मक राहिले. सर्व विषयांवर एकमताने निर्णय घेत संस्थेच्या विकासासाठी एकजूट कायम असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

सभेच्या शेवटी चेअरमन यशवंत चौधरी यांनी उपस्थित सभासद, संचालक आणि पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला

Previous Post

वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण

Next Post

धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
154
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
23
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
34
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
8
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
88
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
17
Next Post
धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In