• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

धुळे विभागातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या शहादा आगाराला वारंवार दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत असून, नवीन बसेसचे वाटप, सुविधा विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत शहादा आगाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महसूलाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या या आगाराला विकासकामांमध्ये मात्र नेहमीच मागे ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, धुळे विभागातील इतर आगारांमध्ये अत्याधुनिक सुविधा, नवीन सेवा आणि ‘राजमाता जिजाऊ’सारख्या नव्या बसेस दाखल होत असताना शहादा आगार मात्र अजूनही जुन्या समस्यांशी झुंज देत आहे. शहादा, अक्कलकुवा, तळोदा आणि परिसरातील हजारो विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी सेवा ही दैनंदिन जीवनाची जीवनवाहिनी आहे. मात्र, या महत्त्वाच्या आगाराला नवीन बसेस आणि सुविधा देताना सातत्याने मागे ठेवले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल

शहादा बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छ परिसर आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाकडे शहादा शहरात कोट्यवधी रुपयांच्या किंमतीच्या मोक्याच्या जागा उपलब्ध असूनही त्यांचा योग्य वापर होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

डोंगरगाव रस्त्यावरील जागा सध्या झाडे-झुडपांनी व्यापलेली असून ती वापराअभावी पडून आहे. तसेच बायपास मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली इमारत आणि परिसरही निष्क्रिय अवस्थेत असल्याचे चित्र आहे. येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्या केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

‘उत्पन्न आमचे, सुविधा कुठे?’

शहादा आगार राज्य परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देत असतानाही त्याला समान न्याय मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. “कमाई शहाद्याची आणि सुविधा इतरांना” अशी भावना व्यक्त करत प्रवाशांनी शहादा आगाराला त्याचा हक्काचा वाटा देण्याची मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मौनावर प्रश्न

या संपूर्ण प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे. बसस्थानकाची दुरवस्था, नवीन बसेसचा अभाव आणि विकासकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत आमदार व खासदारांनी ठोस भूमिका घेतलेली दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय, प्रवाशांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा दावा करणाऱ्या विविध प्रवासी संघटनांनीही या विषयावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता

सध्या शहाद्यातील हजारो नागरिकांना एसटी सेवेशिवाय दुसरा प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी शहादा आगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन बसेस, सुधारित सुविधा आणि प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

अन्यथा, शहादा आगारावरील अन्यायाविरोधात प्रवाशांचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी

Next Post

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In