• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार; पुलावरील कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार; पुलावरील कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

वाठार-वाई मार्ग | प्रतिनिधी

वाठार ते पिंपोडे रस्त्यावर असलेला वाकडा पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरील संरक्षक कठडे अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच इतर नागरिक या रस्त्याचा नियमित वापर करतात. मात्र पुलावरील संरक्षक कठडे पूर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भाग आधीपासूनच अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत पुलावरील सुरक्षाव्यवस्था कोलमडलेली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुलाच्या दुरवस्थेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून, विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका होत आहे.

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन पुलावरील कठड्यांची दुरुस्ती व आवश्यक डागडुजीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वीच या समस्येचे निराकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

श्रीरामपूरातील कोचिंग क्लासवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना रिपाईचे निवेदन

Next Post

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
30
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In