• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वेरूळमध्ये जमावाच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
वेरूळमध्ये जमावाच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट
0
SHARES
119
VIEWS
Ad 1

आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा

कन्नड | प्रतिनिधी

जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

नेमकी घटना काय?

प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश बोरसे हे आपल्या घरी असताना घराबाहेर काही जण मद्यप्राशन करून वाहनांसह गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी घराबाहेर येऊन संबंधितांना शांत राहण्याचा आणि तेथून निघून जाण्याचा सल्ला दिला.

मात्र, यानंतर वाद वाढला आणि काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बोरसे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींना अटक करण्याची मागणी

या घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही नातेवाईकांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

परिसरात तणावपूर्ण शांतता

घटनेनंतर वेरूळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षक सुरेश बोरसे यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या घटनेचा निषेध विविध स्तरांतून केला जात आहे.

Previous Post

अंबाला ठाकरवाडी येथे ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर व ओळखपत्र वाटप संपन्न

Next Post

FDA अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
9
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

FDA अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In