• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प. मराठी शाळेच्या विद्यार्थ्याची मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

शिवणी रसुलापूरचा अजिंक्य झाला पोलीस उपनिरीक्षक

प्रतिनिधी | शिवणी रसुलापूर

शिवणी रसुलापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक अजिंक्य सुनंदाताई ओंकार ढोके यांची मुंबई पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ५८३ प्रशिक्षणार्थींमध्ये अजिंक्य यांनी ४५ वी रँक प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

विशेष म्हणजे, यापूर्वीही अजिंक्य यांची नांदगाव खंडेश्वर येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांची तलाठी पदासाठीही निवड झाली होती. मात्र, पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

अजिंक्य यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, शिवणी येथे पूर्ण केले. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजिंक्य यांनी अनेक अडचणींवर मात करत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासशिवाय त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश मिळवले.

अजिंक्य यांच्या यशाची बातमी समजताच शिवणी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भव्य स्वागत रॅली काढली. गावातील विविध ठिकाणी त्यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शाल, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजिंक्य यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श असल्याचे सांगितले.

अजिंक्य ढोके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःच्या अथक परिश्रमांना दिले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.

अजिंक्य यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शिवणी रसुलापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

Previous Post

ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित

Next Post

नेरपिंगळाई गावात अवैध उत्खनन व विटभट्ट्यांबाबत नागरिकांचा संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

नेरपिंगळाई गावात अवैध उत्खनन व विटभट्ट्यांबाबत नागरिकांचा संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In