• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
72
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली ४३ वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पैलवान सुभाष दादा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक ७ जून रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

ह.भ.प. किशोर महाराज जाधव हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करत आहेत. देव, देश आणि धर्म यांचा प्रचार-प्रसार करताना समाजपरिवर्तनाचा संदेश देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सध्या ते महाराष्ट्र राज्य वारकरी मंच चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा समिती चे सदस्यही आहेत. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्यातील वारकरी, पदाधिकारी आणि भक्तगणांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या पुरस्कार सोहळ्यास हिंदूरत्न ह.भ.प. दिलीप पाटील, ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे, ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे, सुधीर महाराज काले आणि ह.भ.प. निरंजन महाराज कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील आध्यात्मिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Previous Post

बोरगाव ग्रामपंचायत आरक्षणात ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

Next Post

जि.प. मराठी शाळेच्या विद्यार्थ्याची मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

जि.प. मराठी शाळेच्या विद्यार्थ्याची मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In