• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भ्रष्टाचाराला जत नगरपरिषदेत थारा नाही : डॉ. रवींद्र आरळी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

जत | प्रतिनिधी

जत नगरपरिषद गतिमान, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत नगरपरिषदेत थारा दिला जाणार नाही, असे प्रतिपादन जत नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

डॉ. आरळी म्हणाले की, जत नगरपरिषदेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रवीण बाबर यांच्याशी संबंधित लाचलुचपत प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेचे कोणत्याही स्तरावर समर्थन केले जाणार नाही. ही घटना नगरपरिषदेच्या प्रतिमेला धक्का देणारी असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरपरिषदेच्या निवडणूक काळातील एका बिलाच्या मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप असून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा संबंध नसल्याचा दावा करत काही मंडळी या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत नगरपरिषदेत विविध विकासकामे सुरू असून ती गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. आरळी यांनी सांगितले.

नगरपरिषदेतील कोणत्याही कामासाठी नागरिकांनी कोणालाही पैसे देऊ नयेत. कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीकडून पैशांची मागणी झाल्यास संबंधित प्रभागातील नगरसेवक किंवा थेट नगराध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जत नगरपरिषदेत पारदर्शक कारभार आणि विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: Arun Koli
Previous Post

ग्राहक पंचायत अक्कलकोटतर्फे एमआरपी सुधारणा कायद्यासाठी निवेदन सादर

Next Post

लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा निधी वळविल्याचा आरोप; उत्कर्षा रूपवते यांची टीका

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
99
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
189
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा निधी वळविल्याचा आरोप; उत्कर्षा रूपवते यांची टीका

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In