• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना; विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

पनवेल | कळंबोली | प्रतिनिधी –

राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोध होत असतानाच महावितरणने ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पूर्वसूचना देणारे संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

महावितरणकडून ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या संदेशानुसार, भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार अद्याप स्मार्ट मीटर न बसविण्यात आलेल्या ग्राहकांचे विद्यमान वीजमीटर ४८ तासांनंतर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. हा संदेश मीटर बदलण्याबाबतची अधिकृत पूर्वसूचना असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

स्मार्ट मीटरचे फायदे सांगताना महावितरणने मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग, मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज वापरावर नियंत्रण, बिलाची पारदर्शकता तसेच सौरऊर्जेच्या उपलब्ध वेळेत घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैशांपर्यंत सवलतीचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला आहे. याशिवाय मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मात्र, स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड प्रणाली लागू होण्याची शक्यता, वीजदरांमध्ये वाढ होण्याची भीती तसेच ग्राहकांवरील आर्थिक भार वाढेल, या कारणांमुळे अनेक ठिकाणी या प्रकल्पाला विरोध होत आहे. विविध संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून काही भागांत नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध दर्शविला आहे.

अशा परिस्थितीत महावितरणकडून थेट ग्राहकांना संदेश पाठवून मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी या संदेशाबाबत नाराजी व्यक्त करत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यभरात सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर प्रकल्पाबाबत महावितरणची पुढील भूमिका काय राहणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. महावितरण आणि विरोधक यांच्यातील हा वाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

महागाईविरोधात काँग्रेसचे कांदिवलीत आंदोलन

Next Post

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा; पनवेलमध्ये पत्रकार परिषद संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा; पनवेलमध्ये पत्रकार परिषद संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In