• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

कोरेगाव, प्रतिनिधी : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत कोरेगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे काही नगरसेवकांचा कल महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला नवचैतन्य मिळाल्याचे बोलले जात आहे. सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बर्गे यांच्या दमदार उपस्थितीची विशेष चर्चा झाली होती.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सध्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी अद्याप पूर्णपणे दूर झालेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतभेदांचा परिणाम मतदानावर होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी कोरेगाव नगरपंचायतीतील अनेक नगरसेवकांशी वैयक्तिक संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते. दुसरीकडे महायुतीतील विविध घटक पक्षांमधील समन्वयाबाबतही चर्चा सुरू आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आलेले पालकमंत्र्यांचे समर्थक मुन्ना काझी यांच्यासोबत निवडणूक रणनीतीसंदर्भात बैठका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या घडामोडींमुळे कोरेगाव परिसरातील राजकारण अधिकच तापले आहे.

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ राहणार की अंतर्गत मतभेदांचा परिणाम दिसून येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कोरेगाव नगरपंचायतीतील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने सर्वच उमेदवारांनी या भागात संपर्क वाढविला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई आगामी काळात कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

गागोदे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक २०२६ आरक्षणासाठी विशेष ग्रामसभा संपन्न

Next Post

प्रशासकीय कारवाईचा धडाका; शहाद्यात व्यावसायिकांचे शटर डाऊन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

प्रशासकीय कारवाईचा धडाका; शहाद्यात व्यावसायिकांचे शटर डाऊन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In