• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेलारवाडीत वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी; वन विभागाकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

आष्टी प्रतिनिधी :

आष्टी तालुक्यातील शेलारवाडी परिसरातील मालदरा शिवारात आज सकाळी वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिक शेतकरी विठ्ठल बबन पठाडे यांच्या वस्तीवरील बैलावर सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान वाघाने हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पठाडे हे नेहमीप्रमाणे बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना बैल रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. बैलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा आणि चाव्याच्या खुणा आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. प्राथमिक तपासात हा हल्ला वाघाने केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत पुढील पडताळणी सुरू असून संबंधित भागावर वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

या घटनेमुळे शेतकरी विठ्ठल पठाडे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे शेतीकामात साथ देणारा बैल गंभीर जखमी झाल्याने परिसरातील शेतकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, वन विभागाने शेलारवाडीसह परिसरातील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतात किंवा वस्तीवर जाताना खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे तसेच पाळीव जनावरांची योग्य सुरक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वन विभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Tags: Shashikant Jarange
Previous Post

रोहित पवार यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा; सरकारविरोधी भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
156
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In