• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिजामाता कन्या विद्यालयात गुणवंतांचा गौरव; नवागत विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

देवळा | प्रतिनिधी | दि. १५ जून २०२६

शालेय जीवनात जिद्द, शिस्त आणि कठोर परिश्रम यांची सांगड घातल्यास यश निश्चितपणे प्राप्त होते, असे प्रतिपादन देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा. डॉ. मालतीताई आहेर यांनी केले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत तसेच मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत विद्यालयात प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता पगार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, नगरपरिषद गटनेते जितेंद्र आहेर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा. बी. के. रौंदळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन सूर्यवंशी, विद्यालयाचे पर्यवेक्षक कौतिक खोंडे तसेच गुणवंत विद्यार्थिनींचे पालक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुणवंत विद्यार्थिनींचा पुस्तक, गुलाबपुष्प आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षरोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उच्च ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

याच कार्यक्रमात एन.डी.एस.टी. अँड एन.टी. सोसायटीच्या कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल एस. टी. पाटील यांचा संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तक योजना अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थिनींसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवेशोत्सवाला आनंददायी स्वरूप प्राप्त झाले.

देवळा तालुक्यातील पत्रकार सोमनाथ जगताप, संजय देवरे आणि महेश सोनकुळे यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एन. आहेर यांनी केले, तर के. एन. दातरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.

Previous Post

औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

Next Post

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
10
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In