• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील औरवाड हद्दीतील कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस आणि ‘वजीर रेस्क्यू फोर्स’च्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मिळालेल्या माहितीनुसार, औरवाड पाणवठा परिसरात कृष्णा नदीच्या पाण्यात एक मृतदेह अडकून पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर औरवाडचे पोलीस पाटील यांनी तात्काळ कुरुंदवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यात सक्रिय असलेल्या ‘वजीर रेस्क्यू फोर्स’च्या जवानांना पाचारण केले. माहिती मिळताच रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर मृतदेह सुरक्षितपणे नदीतून बाहेर काढण्यात यश मिळवले.

यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सदर मृतदेह अज्ञात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Previous Post

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Next Post

जिजामाता कन्या विद्यालयात गुणवंतांचा गौरव; नवागत विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
10
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post

जिजामाता कन्या विद्यालयात गुणवंतांचा गौरव; नवागत विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In