• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांनी सतर्कतेने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

सांगली, दि. १६ :
शास्त्रज्ञांनी यंदा ‘सुपर एल निनो’चा इशारा दिल्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र आणि संभाव्य दुष्काळाची स्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उपसा बंदी आदेश लागू केले असून, पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हास्तरावर महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी सतर्कतेने काम करून अनधिकृत पाणी उपसा रोखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.

एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात होणारी घट तसेच धरण व प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याच्या योग्य वापराबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दूरदृश्य प्रणाली कक्षात झालेल्या या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, महापालिका आयुक्त संजिता महापात्रा, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले की, एल निनोच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदी, विविध जलाशये, तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, कालवे, पाझर तलाव आणि विहिरी यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विनापरवाना पाणी उपसा झाल्यास नियोजित पाणी वितरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने ही उपाययोजना हाती घेतली आहे.

भरारी पथकांनी आपल्या क्षेत्रातील नदीपात्र, कालवे आणि बंधारे परिसरातील जलस्त्रोतांची दररोज तपासणी करावी. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास तात्काळ आणि कडक कारवाई करावी. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ आणि केंद्रीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत अनधिकृत पंप, इंजिन, पाईपलाईन व इतर साहित्य जप्त करून दंड आकारावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महावितरण विभागाला देखील अनधिकृत वीज जोडणी किंवा पंपासाठी होणारा विजेचा बेकायदेशीर वापर आढळल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

असे असेल भरारी पथकाचे स्वरूप

प्रत्येक महसूल मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकात जलसंपदा, जलसंधारण किंवा जिल्हा परिषद विभागाचे शाखा अभियंता हे समन्वयक असतील. त्यांच्यासोबत महावितरण कंपनीचे शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता, संबंधित मंडळ अधिकारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश राहणार आहे.

Previous Post

हुपरी येथील नगरसेविका सौ. माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला अवैध

Next Post

आजरा येथील प्रसिद्ध रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

आजरा येथील प्रसिद्ध रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In