• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक; वर्षभरानंतर गुन्हा उघडकीस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

वर्धा प्रतिनिधी :
वडनेर पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा अखेर वर्षभरानंतर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मौजा खाखोपुर येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने ११ एप्रिल २०२५ रोजी वडनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की, त्यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वडनेर येथे अप. क्र. १३७/२०२५ कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RelatedPosts

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

तपासादरम्यान आरोपी आणि पीडित मुलीचा शोध लागत नसल्याने गुन्ह्यात पुढे कलम १४३(४) बीएनएसची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि विविध माध्यमांतून माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार आरोपी आणि पीडित मुलगी हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मौजा खाखोपुर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा रचत आरोपी सौरभ भास्कर गगनाईक (वय २२, रा. घुग्गूस, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले. तसेच अल्पवयीन पीडित मुलीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीला कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमळ, पो.हवा. अमर लाखे, नितेश मेश्राम, संजयसिंग सूर्यवंशी, संजय राठोड, चंद्रकांत बुरंगे, नवनाथ मुंडे, म.पो.हवा. शबाना शेख तसेच सायबर सेलचे पो.हवा. अक्षय राऊत आणि गोविंद मुंडे यांनी सहभाग घेतला.

Previous Post

सेलू शहरात दूषित पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न; नागरिकांमध्ये संताप

Next Post

खापरी गावात ४ फूट विषारी नागाला सर्पमित्र पप्पू कांबळे यांचे जीवदान

Related Posts

Blog

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

June 19, 2026
0
Blog

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

June 19, 2026
0
Blog

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

June 19, 2026
0
Blog

सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी : खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’अंतर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर!

June 19, 2026
0
Blog

१७ वी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ मध्ये वाघेरीच्या खेळाडूंचे घवघवीत यश; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल…!

June 19, 2026
0
Blog

धांमत्री गावचा महाकाय घंटा आणि नागेश्वर मंदिराचा इतिहास

June 19, 2026
2
Next Post

खापरी गावात ४ फूट विषारी नागाला सर्पमित्र पप्पू कांबळे यांचे जीवदान

ताज्या बातम्या

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

June 19, 2026

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

June 19, 2026

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In