• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर येथील शाळेच्या कार्यक्रमावरील व्हिडिओ व्हायरल; कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जालना प्रतिनिधी :
परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील कथित आक्षेपार्ह सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन तसेच विशिष्ट पोशाख परिधान करून एका गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक स्वरूपाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचे छायाचित्र, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले पोस्टर तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसणारा ध्वज दाखविण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

लहान मुलांचा वापर करून अतिरेकी विचारसरणीचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. शाळा ही विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचे केंद्र असताना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे गंभीर बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, निवेदनातील आरोपांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून चौकशी होणे बाकी आहे.

Previous Post

शेतकरी बळीराजाची पावसाकडे आर्त हाक

Next Post

औरंगाबाद–जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार; जिल्ह्यात २३७ मतदारांचा मतदान हक्काचा वापर

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

औरंगाबाद–जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार; जिल्ह्यात २३७ मतदारांचा मतदान हक्काचा वापर

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In