• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिरूर नगरपरिषदेचा पुढाकार; २३ जून रोजी ‘एकल महिला दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
172
VIEWS
Ad 1

पुणे प्रतिनिधी

शिरूर : समाजातील एकल महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्क, अधिकार आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता शिरूर नगरपरिषदेच्या जुने कार्यालय येथे ‘एकल महिला दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

एकल महिलांना सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात येणार आहे. महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन, विविध शासकीय सुविधा तसेच त्यांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, उपस्थित महिलांना त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा मांडण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शिरूर शहरातील सर्व एकल महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध मार्गदर्शन, माहिती आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष श्री. मितेश गादीया, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार तसेच मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रमाची माहिती

दिनांक : २३ जून २०२६ (मंगळवार)
वेळ : दुपारी ३.०० वाजता
स्थळ : शिरूर नगरपरिषद, जुने कार्यालय, शिरूर

महिला व बालविकास विभाग, शिरूर नगरपरिषद, घोडनदी

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांद्वारे आर्थिक स्वावलंबन तसेच महिलांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ शिरूर शहरातील सर्व एकल महिलांनी घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Previous Post

महाळुंगे वाहतूक विभागाचा अभिनव जनजागृती उपक्रम; नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

Next Post

दोडामार्गमध्ये शिक्षकाला मारहाण; युवती प्रकरणामुळे गावात तणाव

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
0
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
4
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
Next Post

दोडामार्गमध्ये शिक्षकाला मारहाण; युवती प्रकरणामुळे गावात तणाव

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In