• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोडामार्गमध्ये शिक्षकाला मारहाण; युवती प्रकरणामुळे गावात तणाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

दोडामार्ग परिसरातील एका गावातील माध्यमिक शाळेत शुक्रवारी गंभीर प्रकार घडला. एका १९ वर्षीय युवतीला पळवून नेल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने थेट शाळेत घुसून एका ५५ वर्षीय शिक्षकाला मारहाण केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शाळा परिसरात तसेच गावात मोठी खळबळ उडाली.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

माहितीनुसार, गावातील १९ वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. संबंधित शिक्षकानेच तिला पळवून नेल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले. ही माहिती गावात पसरताच मोठा जमाव थेट शाळेत पोहोचला. जमावाने शिक्षकाला वर्गाबाहेर बोलावून त्याची विचारपूस करत मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणी आणि शिक्षक या दोघांची समोरासमोर चौकशी केली.

चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने, “मी आई-वडिलांकडे जाणार नसून शिक्षकासोबतच राहणार आहे,” असा स्पष्ट निर्णय पोलिसांसमोर व्यक्त केला. तिने यासंदर्भात लेखी जबाबही दिला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संबंधित तरुणी ही कायद्यानुसार सज्ञान असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या निर्णयानंतर काही ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. “संबंधित शिक्षक पुन्हा शाळेत दिसल्यास त्याला धडा शिकवू,” असा आक्रमक पवित्रा काहींनी पोलीस ठाण्यात घेतल्याचे समजते.

यावर पोलिसांनी ग्रामस्थांना कायदा हातात न घेण्याचा इशारा दिला. संबंधित तरुणी सज्ञान असून तिने स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही पुन्हा कायदा हातात घेण्याचा किंवा शिक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

Previous Post

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिरूर नगरपरिषदेचा पुढाकार; २३ जून रोजी ‘एकल महिला दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

दोडामार्गात वीज सुरक्षेचा बोजवारा; अपघाताची वाट पाहतेय महावितरण!

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
44
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
33
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
8
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
40
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
21
Next Post

दोडामार्गात वीज सुरक्षेचा बोजवारा; अपघाताची वाट पाहतेय महावितरण!

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In