• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वणी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड; २० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

वणी प्रतिनिधी :
वणी पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्री. भानुदास पिदूरकर यांनी अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून वणी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई करत तब्बल २० लाख १३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. २२ जून रोजी वणी शहरात पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे दीपक चौपाटी परिसरातून एका काळ्या रंगाच्या कारमधून तसेच मोपेडद्वारे अवैध दारू विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घुग्गुस रोडवर काळ्या रंगाची कार (क्र. MH 42 BE 9395) अडवून तपासणी केली.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

तपासणीदरम्यान कारमध्ये विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूची किंमत २७ हजार ७३० रुपये असून कारसह एकूण १९ लाख २७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक प्रमोद भारत टोंगे (रा. शिंदोला) याला अटक करण्यात आली आहे.

यानंतर काही वेळातच दीपक चौपाटीहून पटवारी कॉलनीकडे जाणाऱ्या एका संशयित मोपेड (क्र. MH 29 BB 0308) ला पोलिसांनी थांबवून झडती घेतली. दुचाकीवरील मोठ्या पिशवीत ६ हजार २४० रुपये किमतीची बेकायदेशीर दारू आढळून आली. या प्रकरणी सुमित उद्धव झुंगे (वय १९) व शुभम अनंता वाघमारे (दोघेही रा. लालगुडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी दोन वाहने व अवैध दारूचा साठा असा एकूण २० लाख १३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे व ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि साजिद सय्यद, पोहेका गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पुरुषोत्तम डडमल, रितेश भोयर, मोरेश्वर खंडरे, नंदकुमार पप्पलवार, माधव दहिकांबळे आणि गजानन कुळमेथे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

Next Post

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In