• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोडोलीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त; शाहूवाडीतील एकाला अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

३.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; कोडोली पोलिसांची धडक कारवाई

बांबवडे प्रतिनिधी :
पन्हाळा तालुक्यातील कोडोली-बोरपाडळे मार्गावरील नृसिंह ओढ्याजवळ कोडोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत तब्बल ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोडोली पोलिसांना बेकायदेशीर विदेशी दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नृसिंह ओढ्याजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

RelatedPosts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या येताना दिसून आली. पोलिसांनी वाहन अडवून झडती घेतली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.

या कारवाईत विदेशी दारूचा साठा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक संतोष दिनकर पाटील (वय ३९, रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) याला जागीच अटक केली. त्याच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर दारू वाहतूक आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात झाल्याचे बोलले जात आहे.

Ad 1
Previous Post

वडगावपीर येथील प्राचीन चिंचेच्या झाडाला वीज पडून आग; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

Next Post

खा. आष्टीकर, देशमुख यांच्या प्रतिमेला जोडेमारो; महाविकास आघाडी व उबाठातर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन

Related Posts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
25
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!
Blog

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026
6
Blog

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
4
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
7
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
Next Post

खा. आष्टीकर, देशमुख यांच्या प्रतिमेला जोडेमारो; महाविकास आघाडी व उबाठातर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In