• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडगावपीर येथील प्राचीन चिंचेच्या झाडाला वीज पडून आग; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी :-

आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथे श्री पिरसाहेब दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या सुमारे ६०० वर्षांहून अधिक जुन्या प्राचीन चिंचेच्या झाडाला वीज पडून आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

रविवार दि. २१ जून रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसादरम्यान या प्राचीन चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्यानंतर सोमवार दि. २२ जून रोजी पहाटे झाडाला आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच फकीरा मुजावर यांनी माजी सरपंच संजय पोखरकर व जायदाबी मुजावर यांना तातडीने माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पाण्याचा टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला.

कारखान्याच्या पाण्याच्या टँकरने दोन फेऱ्या करून झाडावरील आग आटोक्यात आणली. मात्र, आग लक्षात येण्यापूर्वीच चिंचेच्या झाडाच्या दोन मोठ्या फांद्या जळून खाली पडल्या होत्या. सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

या प्राचीन चिंचेच्या झाडाला आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी श्री पिरसाहेब दर्गा परिसरात मोठी गर्दी केली व घटनास्थळी पाहणी केली. आग आटोक्यात आणण्यासाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल नंदूभाई मुजावर, हनीफ मुजावर, फकीरा मुजावर तसेच ग्रामस्थांनी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचे आभार व्यक्त केले.

Tags: Surendra Sonawane
Previous Post

माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा

Next Post

कोडोलीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त; शाहूवाडीतील एकाला अटक

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
169
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

कोडोलीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त; शाहूवाडीतील एकाला अटक

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In