• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भोजूनगरात शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुःखद घटना; कर्त्या तरुणाच्या निधनाने कुटुंबावर संकट

प्रतिनिधी | फुलसावंगी

उमरखेड तालुक्यातील भोजूनगर येथे शेतात जनावरे चारत असताना एका तरुणावर वीज कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश गणेश आडे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गुराखीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

फुलसावंगी परिसरात पावसाची आतुरतेने प्रतीक्षा सुरू असतानाच आज वरुणराजाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या आनंदावर भोजूनगर येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोजूनगर येथील महेश आडे हा तरुण नेहमीप्रमाणे आपली जनावरे जवळील शेतात चारण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी महेशने जवळील झाडाचा आसरा घेतला. मात्र, त्याच वेळी झाडावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महेशला उपचारासाठी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

महेशच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्याच्या पश्चात तीन बहिणी, एक अंध भाऊ आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. गुराखीचे काम करून तोच कुटुंबाचा आधार होता. त्यामुळे कर्त्या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

या दुःखद घटनेमुळे भोजूनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने संबंधित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

खा. आष्टीकर, देशमुख यांच्या प्रतिमेला जोडेमारो; महाविकास आघाडी व उबाठातर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन

Next Post

बोपगाव येथे नवनाथ देवस्थान पंच कमेटी ट्रस्टच्या वतीने शालेय वह्यांचे वाटप

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

बोपगाव येथे नवनाथ देवस्थान पंच कमेटी ट्रस्टच्या वतीने शालेय वह्यांचे वाटप

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In