• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समरसता लोककला संमेलन २०२६ चे पुण्यात भव्य आयोजन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “समरसता लोककला संमेलन २०२६” या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

या संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर मोहोळ, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष म्हणून रघुवीर खेडकर तर स्वागताध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलनात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लोककला दिंडी, दुर्मिळ लोकवाद्य प्रदर्शन, पारंपरिक लोककला दर्शन, विशेष मुलाखती, कवी संमेलन, चर्चासत्र तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

कवी संमेलनात तुकाराम धांडे, वा. ना. आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण सहभागी होणार आहेत. तसेच साहित्य, लोककला आणि संस्कृती विषयांवर विविध मान्यवर विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी रघुवीर खेडकर आणि नंदेश उमप यांची विशेष मुलाखत संदीप पाठक घेणार आहेत.

गोंधळी, वासुदेव, शाहिर, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी यांसह राज्यभरातील सुमारे १५० लोककलावंतांच्या सहभागातून लोककलांचे सादरीकरण होणार आहे. तसेच दुर्मिळ लोकवाद्यांचे प्रदर्शन आणि लोकपरंपरेशी संबंधित विविध उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, संस्कृती आणि लोककला क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा ठरणार आहे.

दूरवरून येणाऱ्या रसिकांसाठी आयोजकांकडून विनामूल्य निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोणी गावचे सुपुत्र, लोककला अभ्यासक व लेखक शाहीर राहूल कुसुम रामचंद्र सोनावणे आणि समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय मोरे यांनी लोणी पंचक्रोशीतील कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Previous Post

चौथा ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गंभीर आरोप

Next Post

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी ‘समता दिंडी’चे आयोजन; सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा होणार

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
9
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
8
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
16
Next Post

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी ‘समता दिंडी’चे आयोजन; सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा होणार

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In