• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जन्मोजन्मी हाच पती लाभो…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

कुरुंदवाडमध्ये वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनींकडून वटवृक्ष पूजन उत्साहात

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : वटसावित्री अर्थात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी सोमवारी पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. “जन्मोजन्मी हाच पती लाभो” अशी प्रार्थना करत शहरातील सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन केले.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

सावित्रीने आपल्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, या पौराणिक कथेनुसार वटसावित्री व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे या दिवशी महिलांकडून वटवृक्षाची पूजा केली जाते.

सोमवारी सकाळपासूनच गणपती मंदिर परिसरासह शहरातील विविध भागांतील वटवृक्षांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी वडाच्या झाडाला हळद-कुंकू वाहून विधिवत पूजा-अर्चा केली. वटवृक्षाभोवती कच्चा सूत गुंडाळत प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

पूजेदरम्यान महिलांनी फळे, फुले, भिजवलेले हरभरे अर्पण केले. सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० या वेळेत पूजा करणे फलदायी मानले जात असल्याने महिलांनी मोठ्या भक्तिभावाने व्रत पूर्ण केले.

सकाळी आठ वाजल्यापासून हातात पूजा साहित्याचे ताट व वाण घेऊन महिला वडाच्या झाडांकडे जात असल्याचे चित्र दिसून आले. पूजा झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना कुंकुम तिलक लावत शुभेच्छा दिल्या तसेच वाण देऊन सणाचा आनंद लुटला.

दिवसभर गणपती मंदिर, डॉ. अल्लमा उर्दू हायस्कूल, स्वामी समर्थ कट्टा कुरुंदवाड-भैरववाडी परिसरातील वटवृक्षांजवळ महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.

Previous Post

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत १२ विषयांना मंजुरी

Next Post

पिशवीतल्या बागेचा नवा ट्रेंड!

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
14
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
3
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
1
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
8
Next Post

पिशवीतल्या बागेचा नवा ट्रेंड!

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In