• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत १२ विषयांना मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

विकासकामांवर चर्चा; सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : येथील नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत विकासाभिमुख १२ विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र काही विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

नगराध्यक्षा मनिषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

सभेमध्ये कुरुंदवाड नगरपरिषदेकडील जन्म-मृत्यू नोंदवहीचे डिजिटल स्कॅनिंग व बाइंडिंग करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सन्मित्र चौक येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जनआरोग्य समिती स्थापन करण्याच्या विषयावरही विचारविनिमय झाला.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विद्युत विभागातील वार्षिक साहित्य पुरवठा, मजुरी कामे, संगणक, प्रिंटर, स्कॅनर खरेदी व देखभाल कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील मोहन गॅरेजसमोरील रस्त्यावर क्रॉस पाइप टाकण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.

सभेत श्री शिवस्मारक टप्पा ३, ४ व ५ अंतर्गत चबुतऱ्याचे भरावासह बांधकाम, विद्युतीकरण, लिफ्ट बसविणे तसेच परिसरात त्रिमिती भित्तीचित्रे उभारण्याच्या विषयांवर चर्चा झाली. यासोबतच मटण मार्केटमधील सांडपाणी निचरा करण्यासंबंधीच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.

शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आयत्या वेळच्या विषयामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

या सभेस नगरसेवक रमेश भुजूगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, शुभम जोंग, अलका पाटील, संगीता कर्नाळे, जुबेरिया गोलंदाज, सुनंदा आलासे, विमल पोमाजे, रुकसाना बागवान, आयेशा बागवान, अलका मधाळे, विजय पाटील, तानाजी आलासे, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण, दीपक परिट, सुजाता जाधव आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला विषयपत्रिकेचे वाचन नंदकुमार चौधरी यांनी केले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंचगंगेला वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई

Next Post

जन्मोजन्मी हाच पती लाभो…

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
7
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
28
Next Post

जन्मोजन्मी हाच पती लाभो...

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In