• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फार्मर कप उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

अभिनेते आमिर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

दर्यापूर प्रतिनिधी : पानी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कृषिमंत्री तसेच पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे तालुकास्तरीय प्रक्षेपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला फार्मर कप उपक्रमात सहभागी झालेले पुरुष व महिला शेतकरी बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

यावेळी तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांनी उपस्थित शेतकरी गटांशी संवाद साधला. तसेच तालुक्यातील युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कुलदीप टोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परिसरात महिलांच्या हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपणही करण्यात आले. झूम लिंकद्वारे तालुक्यातील अनेक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे.” पुढील काळात हेच शेतकरी गट इतर शेतकऱ्यांना एकत्र आणून शेती विकासासाठी प्रेरणा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले की, गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. सामूहिक नियोजनातून शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होऊ शकते.

यावेळी अभिनेते आमिर खान यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “मार्गदर्शक शेतकरी गट हे शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत. डिजिटल माध्यम आणि प्रत्यक्ष संवाद यांच्या प्रभावी संगमामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरेल.”

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी तालुक्यातील शेतकरी गट, कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या मार्गदर्शकांशी थेट संवाद साधला.

या कार्यक्रमाला सर्व कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच कृषी विभाग व आत्मा प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Dipak Meshram
Previous Post

गोंडगाव अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी; भाजप नेते अनिल वाघ यांचा घणाघाती आरोप

Next Post

लावणी विश्वाचा अभिमान – नमिता पाटील यांना ‘बालगंधर्व लावणी पुरस्कार २०२६’ जाहीर

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
4
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
9
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
39
Next Post

लावणी विश्वाचा अभिमान – नमिता पाटील यांना ‘बालगंधर्व लावणी पुरस्कार २०२६’ जाहीर

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In