• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोंडगाव अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी; भाजप नेते अनिल वाघ यांचा घणाघाती आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

न्याय न मिळाल्यास भडगाव तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा भाजपचा इशारा

भडगाव प्रतिनिधी : नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या ६० दिवसांत फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल विशेष जलदगती न्यायालय तसेच महायुती सरकारचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांचेही यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते अनिल वाघ यांनी भडगाव तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन गोंडगाव येथील अत्याचार प्रकरणावरून स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

अनिल वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे २०२३ मध्ये एका सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. पीडितेला न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय मोर्चे, आंदोलने आणि भडगाव बंदसारखे उपक्रम राबविण्यात आले होते.

त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र इतकी वर्षे उलटूनही पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

अनिल वाघ म्हणाले की, “स्थानिक आमदारांनी या संवेदनशील प्रकरणाचा पाठपुरावा विधानसभेत कधीही केला नाही. उलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.”

पत्रकार परिषदेत त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. गोंडगाव प्रकरण खरोखरच जलदगती न्यायालयात सुरू आहे का, विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे का, तसेच केवळ राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेची दिशाभूल केली जात आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

तसेच भोर तालुक्यातील प्रकरणात जसा समन्वय साधण्यात आला, तसा समन्वय स्थानिक आमदारांना साधता आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

गोंडगाव प्रकरणातील पीडितेला तातडीने न्याय मिळाला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भडगाव तालुक्यात पुन्हा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा अनिल वाघ यांनी दिला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद नेरकर, शेतकरी आघाडी जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, हर्षल पाटील, शहराध्यक्ष निलेश पाटील, तालुका सरचिटणीस किरण शिंपी, महिला आघाडी तालुकाध्यक्षा योजना पाटील, सुशीला पाटील, शहराध्यक्षा योगिता पाटील, नगरसेवक सचिन चोरडिया, मुरली भिल्ल, चेतन पाटील, आबा महाजन, विशाल चौधरी, कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला धामोरी येथे उत्साहात प्रारंभ

Next Post

फार्मर कप उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

फार्मर कप उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In