• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मांगी तलावातील पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश; वस्तुस्थिती अहवाल येईपर्यंत कारवाई स्थगित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

करमाळा (प्रतिनिधी) : मांगी तलावातील पाणी हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याच्या प्रस्तावावरून करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वस्तुस्थितीचा अहवाल मुख्य अभियंत्यांनी सादर करेपर्यंत कोणतीही पुढील कारवाई करू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषद भाजप गटनेत्या रश्मी बागल यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत भूमिका मांडली. मांगी तलावात अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील हळगाव कृषी महाविद्यालयाला पाणी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

रश्मी बागल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मांगी तलावाची साठवण क्षमता वाढवून त्यामध्ये दीड टीएमसी पाणी सोडण्याची व्यवस्था प्रथम करण्यात यावी. त्यापैकी एक टीएमसी पाणी करमाळा तालुक्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी देण्याचे नियोजन करता येईल. मात्र सद्यस्थितीत करमाळा तालुक्याच्या गरजा पूर्ण न होता पाणी वळविण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी महाविद्यालयाला देण्याच्या निर्णयानंतर करमाळा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्र्यांनी मुख्य अभियंत्यांकडून वस्तुस्थिती अहवाल मागवून तो प्राप्त होईपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Tags: Satish Neel Patil
Previous Post

फातेमा बी यांचे निधन

Next Post

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त बबन ढोबळे यांचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
22
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
50
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
Next Post

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त बबन ढोबळे यांचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In