मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील खडकपुरा परिसरातील रहिवासी फातेमा बी मोहम्मद हुसेन बागवान (वय अंदाजे ७५) यांचे मंगळवार, दि. ३० जून रोजी सायंकाळी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मानवत येथील मोठा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फातेमा बी या अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्या सर्वांशी आपुलकीने संवाद साधत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीयांसह समाजात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती, चार मुले, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अफसर बागवान, अफजल बागवान, फेरोज बागवान आणि एजाज बागवान यांच्या मातोश्री होत. नागरिकांनी बागवान कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
