• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडेगाव एसटी स्थानक व ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या सुटणार तरी कधी? – डी. एस. देशमुख यांचा सवाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कडेगाव | प्रतिनिधी

कडेगाव येथील एसटी स्थानक आणि ग्रामीण रुग्णालयातील समस्या अद्याप कायम असून, अडीच वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतरही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जनसेवक डी. एस. देशमुख यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

RelatedPosts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

मागील अडीच वर्षांपूर्वी डी. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष समिती आणि कडेगाव ग्रामस्थांनी एसटी स्थानक परिसरातील साचलेले पाणी, डबकी, अस्वच्छ शौचालये व मुताऱ्या तसेच ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्यसेवा आणि अस्वच्छतेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. त्यावेळी प्रशासनाकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कडेगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक एसटी स्थानक व ग्रामीण रुग्णालयाचा वापर करतात. तालुक्याची ओळख असलेल्या या दोन्ही ठिकाणी आजही घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, साचलेले पाणी आणि अपुऱ्या सुविधा असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण रुग्णालयातही स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सेवांबाबत अनेक प्रश्न कायम आहेत. “विकास” आणि “स्वच्छ भारत”च्या घोषणा केवळ भाषणांत दिसतात; प्रत्यक्षात मात्र तालुक्याच्या मुख्य ठिकाणाची अवस्था अत्यंत लाजीरवाणी असल्याची टीका डी. एस. देशमुख यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, “निवडणुकांच्या काळात जनतेच्या समस्या लक्षात घेतल्या जातात; मात्र निवडून आल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना अस्वच्छता आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.”

यावेळी त्यांनी संबंधित प्रशासन, एसटी महामंडळ, ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन नियमित स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, पुरेसे कर्मचारी आणि सातत्यपूर्ण देखभाल यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

“आता आश्वासने नकोत, कृती हवी. अन्यथा अडीच वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी दिला आहे.

Tags: Mukund Sukte
Previous Post

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट येथे कृषिनायक वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Next Post

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवडीचे मार्गदर्शन

Related Posts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश
Blog

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
2
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
Blog

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
15
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन
Blog

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026
2
आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण  उपोषणास सुरवात..
Blog

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

August 16, 2026
52
Blog

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

August 16, 2026
1
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.
Blog

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

August 16, 2026
6
Next Post

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवडीचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In