• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य द्या; तांत्रिक उत्पादन पद्धत सदोष – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

पीक विमा धोरणात बदलासाठी केंद्राकडे आग्रही भूमिका घेण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव | प्रतिनिधी :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करताना सध्या वापरण्यात येणारी ‘तांत्रिक उत्पादन’ निश्चितीची पद्धत अनेकदा प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचे अचूक चित्र दाखवत नाही. त्यामुळे हजारो शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पद्धतीऐवजी प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य देण्यात यावे, अशी ठाम भूमिका राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.

तांत्रिक उत्पादन पद्धतीतील त्रुटींवर बोट

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झालेल्या चर्चेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या २०२५-२६ हंगामात तांत्रिक उत्पादन निश्चितीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञांकडून स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये DSSAT मॉडेलद्वारे तांत्रिक उत्पादन निश्चिती, प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग, हवामानातील बदल, अतिवृष्टी, पाणी साचणे, रोग-किडींचा प्रादुर्भाव तसेच स्थानिक कृषी परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून विद्यमान तांत्रिक उत्पादन निश्चिती पद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचाही राज्य शासनाकडे अहवाल

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनीही कृषी विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाकडे अहवाल सादर करून प्रत्यक्ष उत्पादन आणि तांत्रिक उत्पादनातील मोठी तफावत अधोरेखित केली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधारे विमा भरपाई देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, विद्यमान तांत्रिक उत्पादन निश्चिती प्रक्रिया अनेकदा प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचे अचूक चित्र दाखवत नाही. परिणामी मोठे नुकसान होऊनही केवळ तांत्रिक अंदाजातील त्रुटींमुळे अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मूलभूत उद्देशच बाधित होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

चार प्रमुख मागण्या

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे चार महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत :

  • केंद्र शासन आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे प्रभावी पाठपुरावा करावा.
  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून तांत्रिक उत्पादनाऐवजी पीक कापणी प्रयोगाला प्रमुख निकष मान्यता द्यावी.
  • कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिक अहवालाचा राज्य शासनाच्या अधिकृत भूमिकेसाठी आधार घ्यावा.
  • भविष्यात तांत्रिक उत्पादनातील त्रुटींमुळे कोणताही शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार नाही, यासाठी धोरणात्मक सुधारणा कराव्यात.

कृषिमंत्री भरणे यांची उच्चस्तरीय बैठक

या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढील आठवड्यात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी तसेच कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत कृषी विद्यापीठाचा वैज्ञानिक अहवाल, धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशी आणि विद्यमान तांत्रिक उत्पादन पद्धतीतील त्रुटींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासन आणि केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार आग्रही भूमिका मांडणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Previous Post

फार्मर आयडीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यावा – डॉ. प्रतापसिंह पाटील

Next Post

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In