• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रारंभ; बीएलओ येणार घराघरात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

३० जून ते २९ जुलैदरम्यान माहिती पडताळणी; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नतिशा माथुर

परभणी | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला ३० जूनपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती व कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी पुनरीक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मतदारांनी बीएलओ भेटीपूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा २००२ च्या विशेष पुनरीक्षणातील तपशील तपासून ठेवावा, त्यामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक जलद होईल, असे त्यांनी सांगितले.

ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव पूर्वीच्या मतदार यादीत नसेल, त्यांनी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल, एलआयसी किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून तयार ठेवावे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघांतील १,६२३ मतदान केंद्रांसाठी १,६२३ बीएलओ, १६३ बीएलओ पर्यवेक्षक आणि १३६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील १५ लाख ४१ हजार ७ मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.

आतापर्यंतच्या मॅपिंगमध्ये १३ लाख ५५ हजार ८८६ (८७.९९ टक्के) मतदारांची माहिती पडताळण्यात आली असून २ लाख ६२ हजार ७७७ त्रुटी (Anomalies) आढळल्या आहेत. तसेच ७० हजार २८८ समान छायाचित्रांच्या नोंदी आणि ३८ हजार १०१ नॉन-स्टँडर्ड फोटो असलेल्या नोंदी निदर्शनास आल्या आहेत.

पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक

  • ३० जून ते २९ जुलै २०२६: घराघरात पडताळणी
  • ५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन
  • ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: दावे व हरकती स्वीकारणे
  • ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६: दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे
  • ७ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी ही सशक्त लोकशाहीची पायाभरणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

श्रीगोंदा–पेडगाव रोडवरील जुना शेतरस्ता खुला; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील कचराकुंडी कायमस्वरूपी बंद; परिसराचे सुशोभीकरण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
96
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post

गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील कचराकुंडी कायमस्वरूपी बंद; परिसराचे सुशोभीकरण

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In