• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

पाडशिंगी येथील शेतकरी भिका लालसिंग पवार व इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेल्या SOYABEAN INV-108 या सोयाबीन बियाण्याबाबत गंभीर तक्रार केली असून, बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बियाणे आलेगाव येथील ऐका कृषी सेवा केंद्रातून खरेदी करण्यात आले होते. मात्र पेरणीनंतर बियाण्यात अपेक्षित उगवण न झाल्याने तसेच अन्य तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

  • संबंधित शेताची तातडीने पंचनामा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी.
  • बियाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.
  • चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बियाण्याच्या विक्रीवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
  • संबंधित कंपनीने ४८ तासांच्या आत प्रभावित शेतकऱ्यांना दर्जेदार नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
  • दोषी आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्यावर बियाणे कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास शेतकरी बांधवांसह पातूर कृषी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन व जबाबदार पक्ष उत्तरदायी राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणात तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदार शेतकरी भिका लालसिंग पवार आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केली आहे.

Previous Post

स्थगिती म्हणजे माघार नव्हे; माहिती अधिकाराच्या लढाईत अंतिम विजय अजून दूर

Next Post

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
20
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
15
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
29
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
24
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
9
Next Post

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In