धुळे | प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत इंदिरा महिला मंडळ, धुळे संचलित आर. आर. परदेशी प्रायमरी स्कूल, वलवाडी येथे मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका मंगला हार्द आणि हर्षदा पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापिका मीरा सरोज तसेच इंदिरा महिला मंडळाच्या सचिव प्रभाजी परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून मनीषा पाटील, पायल निकम, साक्षी साळुंखे, अंकिता पवार, रंजना पाटील, सुरेखा मोरे, सुनीता महाले, दिपाली सूर्यवंशी, गायत्री पाटील, सुनिता हातगीर, शालिनी पाटील, मोहिनी महाले, तेजस्विनी मोरे, भारती सूर्यवंशी, रेखा पाटील, सीमा मिस्तरी, प्रगती मिस्तरी, संगीता अहिरराव, कल्याणी चव्हाण, मीनाक्षी केदार, वैशाली देवरे, कविता पवार, चारुलता ठाकूर यांच्यासह अनेक पालक व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच वृक्षांचे पर्यावरण संवर्धनातील महत्त्व, मानवी जीवनातील त्यांचे अनन्यसाधारण योगदान आणि “वसुंधरा – मानवजातीसाठी अमूल्य वरदान” या विषयावर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
