• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ कथासंग्रहाचे प्रकाशन; सामाजिक भान जपणाऱ्या कथा – ई. झेड. खोब्रागडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ कथासंग्रहाचे प्रकाशन; सामाजिक भान जपणाऱ्या कथा – ई. झेड. खोब्रागडे
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

अमरावती | प्रतिनिधी :

प्रसिद्ध कथाकार डॉ. रवी दलाल यांच्या साहित्याचा वेध घेणाऱ्या ‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ या कथासंग्रहाचे नागपूर येथे प्रकाशन संपन्न झाले. या कथासंग्रहाचे संपादन लेखक विभूतीचंद्र गजभिये यांनी केले आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह, लष्करीबाग येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे होते, तर उद्घाटक म्हणून डॉ. लालसिंग मिसाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना ई. झेड. खोब्रागडे म्हणाले की, “समाजव्यवस्थेने नाकारलेल्या शेवटच्या घटकांतील माणूस हा रवी दलाल यांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या कथा सामाजिक भान जपणाऱ्या असून उपेक्षितांचा आवाज बुलंद करणाऱ्या आहेत. सध्याच्या काळात साहित्यिकांनी संविधानवादी भूमिका घेत सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.”

कार्यक्रमात डॉ. रवी दलाल, बाळासाहेब काळे (निवृत्त उपसंचालक, भूमिअभिलेख), प्रबोधनकार अशोक सरस्वती, रामभाऊ डोंगरे, विकास राऊत, प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे, डॉ. भन्ते अभयनायक, डॉ. कृष्णकांत डोंगरे तसेच लेखक व संपादक विभूतीचंद्र गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. शोभा पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.

यावेळी कथाकार डॉ. रवी दलाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमध्ये विखुरलेल्या कथा एकत्र करून त्यांना पुस्तक स्वरूप देण्याचे श्रेय विभूतीचंद्र गजभिये यांना जाते. त्यांच्या सामाजिक जाणिवेची आणि साहित्यनिष्ठेची त्यांनी प्रशंसा केली.

प्रबोधनकार अशोक सरस्वती यांनीही विभूतीचंद्र गजभिये यांच्या सामाजिक कार्याचा व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

समारोपात ई. झेड. खोब्रागडे यांनी रवी दलाल यांच्या कथा परिवर्तनवादी विचारांना बळ देणाऱ्या असून सामाजिक आणि धार्मिक जागृती घडविण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे सांगितले. तसेच या कथा वाचकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.

उत्तरपर भाषणात विभूतीचंद्र गजभिये यांनी साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून जागृत लेखकाची समाजातील घडामोडी मांडण्याची जबाबदारी असते, असे सांगितले. या कार्यात पत्नी दर्शना यांच्या सहकार्यामुळेच हे काम पूर्णत्वास नेऊ शकलो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सागर भवते यांनी केले, तर प्राचार्य वसंत वावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्य, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Tags: Avinash Gondane
Previous Post

मुसळधार पावसाने चिखलीतील पाटील नगर, डिफेन्स कॉलनी जलमय; नगरसेवक विकासभाऊ साने घटनास्थळी

Next Post

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In