• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवतात प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी; पोलिसांना निवेदन, शहरात कडक बंदोबस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
मानवतात प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी; पोलिसांना निवेदन, शहरात कडक बंदोबस्त
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

मानवत | प्रतिनिधी :

मानवत शहरातील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी पोलिस निरीक्षक, मानवत पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

निवेदनानुसार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता जुने बसस्थानक परिसरातील सोमाणी हॉस्पिटलजवळ अभयसिंह मधुकरराव दहे यांना मोटारसायकलवर कट मारून अडविण्यात आले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते ॲड. विक्रमसिंह मधुकरराव दहे यांच्यासह दोघांवर कथितपणे प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात शहरात काही व्यक्तींकडून भरधाव वाहन चालविणे, नागरिकांना धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणे, विनापरवाना दारू विक्री, अवैध सावकारी, नागरिकांची वाहने बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे तसेच इतर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून घटनेचा सखोल तपास करावा तसेच यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील मागण्यांचाही विचार करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, गोपनीय शाखेचे अनिस कौसडीकर, विलास मोरे, सय्यद फय्यास, अतुल पंचांगे, शेख मुखिद, सुनीलसिंग बावरी, दीपक भेंडे तसेच वाहनचालक अविनाश डंबाळे यांच्यासह पोलीस पथकाने शहरात विशेष गस्त घालत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग केले.

या घटनेच्या निषेधार्थ मानवत शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या निवेदनावर शहरातील अनेक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला.

Ad 1
Previous Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अहेरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; “विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढणे हेच आमचे दायित्व” – प्रा. धर्मेंद्र मुनघाटे

Next Post

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पथ्रोट पोलिसांची धडक कारवाई; दोन देशी कट्टे, मॅगझिन व काडतुसे जप्त

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पथ्रोट पोलिसांची धडक कारवाई; दोन देशी कट्टे, मॅगझिन व काडतुसे जप्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In