• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले
0
SHARES
429
VIEWS
Ad 1
Ad 1

अस्तगाव | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेत यश संपादन करून शिर्डी येथे केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डांगेवाडी येथील शिक्षक प्रविण खंडीझोड तसेच काकडी शाळेतील केंद्रप्रमुख सचिन घुसळे यांचा निरोप समारंभ डांगेवाडी येथे भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना अनेक विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.

प्रविण खंडीझोड हे गेल्या तीन वर्षांपासून डांगेवाडी शाळेत कार्यरत होते. अल्प कालावधीत त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले. शाळेचे रंगकाम, भौतिक सुविधा, इयत्ता पाचवीची वर्गवाढ, नवीन वर्गखोली, शौचालय, संगणक, इंटरॲक्टिव्ह बोर्ड यांसह शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन वर्षे इयत्ता पाचवीचा १०० टक्के निकाल लागला. एका विद्यार्थ्याची सरस्वती अकॅडमी, लोणावळा (नवोदय समकक्ष) येथे निवड झाली, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत विद्यार्थी घडले तसेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेतही शाळेला यश मिळाले. केवळ २४ विद्यार्थीसंख्या असलेल्या डांगेवाडी शाळेचे नाव जिल्हाभर पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेत १६१ गुण मिळवत राज्यात नववा क्रमांक मिळवल्याने त्यांची शिर्डी येथे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका साळी मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांनी केले होते. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ व पोशाख देऊन गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शाळेतील १३ विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. गावकऱ्यांनीही खंडीझोड सरांनी शाळेसाठी केलेल्या कार्याची आठवण सांगत त्यांना भावपूर्ण निरोप दिला. आपल्या मनोगतात खंडीझोड यांनी डांगेवाडीकरांचे प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील, असे सांगत शाळेच्या विकासकामांसाठी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच या यशामध्ये माजी मुख्याध्यापक झोडगे सर, प्रविण त्रिभुवन सर आणि मुख्याध्यापिका साळी मॅडम यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी एसएमसी अध्यक्ष दत्तू कांदळकर, वाल्मीक बडे, माळी सर, शिरोळे सर, गणेश कांदळकर, साईनाथ कांडेकर, बाबासाहेब कांडेकर, संतोष चांदगुडे, बापू कदम, सुभाष कांडेकर, सुजित पवार, प्रकाश वामन, लता कांडेकर, पूजा कांडेकर, मंदा कांदळकर, आरती कांडेकर यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बाबा कांडेकर यांनी भूषविले. मुख्याध्यापिका साळी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले, तर गोकुळ कांडेकर यांनी उपस्थितांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली.

Ad 1
Previous Post

जुन्या वादातून मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर चंद्रपूर येथे उपचार

Next Post

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
255
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post
नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In