• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
39
VIEWS
Ad 1
Ad 1

वाळवा | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथून श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सुमारे अडीच ते तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पालखीचे पहिले रिंगण गडपटा येथे होणार असून त्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम ताकारी येथे असेल. किल्ले मच्छिंद्रगड ते ताकारी या मार्गावरील लवणाची, येडे मच्छिंद्र, भवानीनगर, रेटरे, हरणाक्ष, दुधारी आदी गावांतील भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत करतात. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी, रांगोळ्या आणि आरतीने श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे स्वागत केले जाते. माता-भगिनी औक्षण करून पालखीचे दर्शन घेतात.

ताकारी येथील मुक्कामानंतर पालखी तुपारी, दह्यारी, घोगाव, कुंडल मार्गे अळसंद येथे मुक्कामी पोहोचते. अशा प्रकारे मजल-दरमजल करत हा पालखी सोहळा शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी वाखरी येथे सर्व संतांच्या पालख्यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहे. वाखरी येथे कीर्तन झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. पंढरपूर येथील मठात दुपारी सुमारे ५ वाजता पालखीचा विसावा होणार आहे.

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा पालखी सोहळा भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा असून दरवर्षी पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातील भाविक मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात.

Ad 1
Previous Post

आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत

Next Post

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In