कोल्हापूर / रिपब्लिकन पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते साताऱ्याला जाणारा असल्याची माहिती आज माध्यमांशी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी दिली.
माळगे म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 67 वा वर्धापन दिन सोहळा साताऱ्यामध्ये पार पडणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते साताऱ्याला जाणार आहेत. या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटक मा. नाम. रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार, व सीमाताई रामदास आठवले (राष्ट्रीय नेत्या) यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे प्रदेशाध्यक्ष, स्वागत अध्यक्ष मा. अशोक (बापू) गायकवाड जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा, प्रमुख निमंत्रक मा. सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.अविनाश महातेकर
यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्र तसचेच देशातून रिपब्लीकन पक्षाचे वरिष्ठ पदाअधीकारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाअध्यक्षा सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थितीत राहून हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सतीश दादा माळगे यांनी दिली आहे.
Discussion about this post