• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत वाळू माफियांचा हैदोस; जप्त हायवा पळवण्यासाठी सिनेस्टाईल थरार, महसूल कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला प्रकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

पाथरी तालुक्यात अवैध वाळू माफियांची वाढती दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. ९ जुलै रोजी सोनपेठ रोडवरील शासकीय गोदाम परिसरात तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळूने भरलेला हायवा ट्रक (क्र. CG-19 BV-7029) जप्त केला. मात्र, तो तहसील कार्यालयाकडे आणत असताना वाहन पळवून नेण्यासाठी माफियांनी सिनेस्टाईल थरार घडविल्याची माहिती शासकीय फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

फिर्यादीनुसार, जप्त केलेल्या ट्रकमध्ये महसूल कर्मचारी सोपान नरवडे यांना बसवून ताफा पाथरीकडे निघाला असताना एका कारने त्यांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. माळीवाडा रस्त्यावर ट्रक अचानक वळवून धावत्या वाहनातून रस्त्यावर वाळू टाकत चालकाने पळ काढला. त्यामुळे महसूल विभागाची पाठलाग करणारी वाहने अडकल्याचे सांगण्यात आले.

यानंतर पाठलाग करणाऱ्या कारने रस्त्यात आडवी उभी राहून महसूल पथकाचा मार्ग अडविला. कारचालक वाहन सोडून फरार झाला. दरम्यान, ट्रकमधील महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून खाली ढकलण्यात आले तसेच त्याच्या जीवावर बेतण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप शासकीय फिर्यादीत करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण शासकीय वाहनातील कॅमेऱ्यात झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर महसूल विभागाने तातडीने तक्रार दिली. मात्र, ९ जुलैला घडलेल्या घटनेचा गुन्हा ११ जुलैच्या रात्री दाखल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महसूल विभागाने तक्रार वेळेत दिल्याचा दावा केला असून, पोलिसांकडून संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले. अखेर वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्यानंतर पाथरी पोलिसांनी चंदू राठोड, वाहन मालक आणि विष्णू घुगे यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होण्यास विलंब का?

घटना ९ जुलै रोजी घडूनही गुन्हा दोन दिवसांनी दाखल झाल्याने महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या काळात प्रकरण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याची चर्चा असून, गुन्हा दाखल होण्यास झालेल्या विलंबामागील कारणांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Ad 1
Previous Post

कारंजा तालुक्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती; शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी

Next Post

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In