• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अकोला येथून सकाळी ८:५० वाजता आलेगावकडे येणारी तसेच आलेगाव येथून सकाळी १०:३० वाजता अकोल्याकडे जाणारी एस.टी. बस सेवा अचानक बंद करण्यात आल्याने आलेगाव व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दररोज अकोला येथील विविध शासकीय व खासगी कार्यालयांतील कर्मचारी, शिक्षक तसेच इतर नोकरदार वर्ग या बसने प्रवास करतात. अंबाशी येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थिनी तसेच आलेगाव, उंबरवाडी व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या बस सेवेवर अवलंबून आहेत. तसेच आलेगावहून सकाळी १०:३० वाजता अकोल्याकडे जाणाऱ्या बसमुळे पातूर येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी, देऊळगाव आयटीआयमधील विद्यार्थी तसेच शासकीय, वैद्यकीय, बँक व इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होत होती.

सुमारे २० हजार लोकसंख्या असलेले आलेगाव हे परिसरातील २० ते २५ गावांसाठी प्रमुख केंद्र आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या महसुलावरही परिणाम होत असल्याचे कापकर यांनी नमूद केले.

आज सकाळी असोला फाटा येथे अनेक शाळकरी विद्यार्थिनी बसच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सकाळी ८ वाजताची अकोला–पांगरा ताटी बस रद्द झाल्यानंतर ८:५० वाजताची अकोला–आलेगाव बसही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.

उंबरवाडी येथील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दररोज आलेगाव येथे ये-जा करतात. त्यामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षित व नियमित वाहतूक उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुलींसाठी शासनाची बस सेवा उपलब्ध असली तरी मुलांना त्या बसमध्ये प्रवास करता येत नसल्याने त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी तसेच उंबरवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र किंवा नियमित बस सेवेची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केली आहे. अन्यथा आलेगाव व परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल तसेच बस सेवा विनाकारण बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रमुख उपस्थिती : दुर्गाबाई डिंगबर ठाकरे, लताबाई सीताराम डुकरे, शीतल प्रकाश धंदरे, रूपाली अमोल वाथे, शोभा बंडू डाखोरे, शालिनी बबन वाथे, कमलाबाई प्रकाश ताजने, लक्ष्मीबाई विष्णू तिवाले, पारूबाई विजय गायकवाड, कमलाबाई रमेश धंदरे, रुक्मा किशन शिंदे, निलेश तोताराम कापकर, समाधान झांगुजी शिंदे आणि समाधान गाढवे उपस्थित होते.

Ad 1
Tags: Rahul Rathod
Previous Post

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

Next Post

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप; उंबरवाडीत अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप; उंबरवाडीत अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In