• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहीदे येथील शासकीय निवासी शाळेतील अन्न विषबाधा प्रकरण गंभीर; १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील मोहीदे त.श. येथील समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधेच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेला तीन दिवस उलटूनही विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

RelatedPosts

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

शनिवारी रात्री विद्यार्थ्यांनी शेवग्याची भाजी, भात आणि चपातीचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, उर्वरित १० विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

समाज कल्याण विभागाचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने शाळेच्या स्वयंपाकगृहातून शिजवलेल्या अन्नाचे तसेच कच्च्या साहित्याचे नमुने जप्त केले असून, विद्यार्थ्यांच्या रक्त व उलट्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

घटनेनंतर शाळा, वसतिगृह आणि रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणामुळे निवासी शाळेतील प्रशासकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेत १५७ विद्यार्थी शिक्षण घेत असताना सात शिक्षकांची मंजूर पदे असूनही प्रत्यक्षात केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच प्रभारी अधिकाऱ्यांवरच शाळा आणि वसतिगृहाची जबाबदारी असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घटनेनंतर सुमारे ३० विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडून घरी जाणे पसंत केले असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

लोणी येथे महिला शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; जीवामृत, दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावर पँथर सेनेचा हल्लाबोल; SIT चौकशीची मागणी

Related Posts

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?
Blog

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026
7
Blog

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026
5
Blog

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026
10
निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….
Blog

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….

August 28, 2026
21
लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.
Blog

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

August 28, 2026
13
सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.
Blog

सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.

August 28, 2026
49
Next Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावर पँथर सेनेचा हल्लाबोल; SIT चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In